logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त केळी पिकांची पाहणी; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आमदार चद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला तात्काळ निर्देश दिले.

वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त केळी पिकांची पाहणी; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला तात्काळ निर्देश!

पाचोरा प्रतिनिधी :-

(जिल्हाध्यक्ष किरण अशोक सुर्यवंशी)

रावेर तालुक्यातील रेभोटा,निंबोल,खिर्डी,एनपूर या गावांमध्ये दि.४ जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या केळी पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.अनेक ठिकाणी केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या असून, केळीचे घड व झाडांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.



शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी संबंधित प्रांत अधिकारी,कृषी विभागाचे अधिकारी तसेच तलाठी यांना तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.तसेच वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमधील रस्त्यांवर मोठमोठी झाडे पडून नुकसान झाले असून, प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडून सूचना देण्यात आल्या.



शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये, शासन व प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.असे ही आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.



याप्रसंगी संबंधित गावांतील शेतकरी बांधव, शिवसेना-युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते विभागीय प्रांत अधिकारी मा.श्री.काकडे साहेब, कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.



0
66 views

Comment