logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खर्डी रेल्वे पुलावरील कठड्याला धडकून दुचाकीस्वार २०० फूट खाली रेल्वे ट्रॅकवर पडले. एकाचा जागीच मृत्यू : एकजण गंभीर जखमी

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

मुंबईहून नाशिककडे जात असताना एका दुचाकीचा अपघात होऊन झालेल्या अपघात एक जण जागीच ठरतात एक जण गंभीर जखमी आहे. याबत सविस्तर असे की विठ्ठल मशाळ रा, पिंपरकणे व त्याचा मित्र गोरक्षनाथ भांगरे रा पिंपरकणे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ०५ एफ एक्स ५०१९ ने टिटवाळ्याहून आपल्या गावी पिंपरकणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे जात होते.मुंबई नाशिक महामार्गावरील खर्डी रेल्वे पुलावर भरधाव दुचाकी नियंत्रणात न आल्याने दुचाकी पुरावरील कठड्याला धडकली. दुचाकी वरील विठ्ठल मशाळ व गोरक्षनाथ हे दोघेही 200 ते 250 फूट खोलवर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर फेकले गेले व दुचाकी रोडच्या बाजूला पडली या भीषण अपघात विठ्ठल मशाळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर गोरक्षनाथ भांगरे हा तरुण गंभीरित्या जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, खर्डी पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य रुपेश भवारी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने मदत खर्डी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी देवराम मशाळ यांस मृत घोषित केले.

गंभीर जखमी गोरक्षनाथ भांगरे यास पुढील उपचारासाठी शहापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

दरम्यान अपघात वेळी कसारा आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान दुरुस्ती ब्लॉक असल्याने लोकल सेवा बंद होत्या त्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यातच अपघात दुचाकी देखील रस्त्याच्या बाजूला पडल्याने मोठी हानी टळली जर दुचाकी स्वार दुचाकीसह कोसळले असते तर दुचाकी ओव्हरहेड वायर याला अडकून मोठा स्फोट झाला असता व त्यामुळे मोठा अनर्थ घडला असता.अतिशय दुर्गम भागात राहत असल्याने गावाकडे रोजगार उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्त
तरुणआपल्याघरच्यांसह
टिटवाळा येथे वास्तव्य करत होते तिथेच काम धंदा करून आपल्या व आपल्या कुटुंबाचा उदरनिवाह करणारे हे तरुण भरधाव वेगात
गावाकडे निघाले असता हा भीषण अपघात
झाला या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त
केली जात आहे.




51
2635 views

Comment