logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाणे-पालघर विधान परिषद निवडणूक: मविआच्या उमेदवाराची माघार, शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध!

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत आज एक मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. महाविकास आघाडीकडून (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट) अर्ज दाखल केलेले उमेदवार अभिजित पवार यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार मा. रवींद्र फाटक यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
का बदलली राजकीय समीकरणे?
या निवडणुकीत भाजपमधील अंतर्गत नाराजीचा फायदा उठवून महाविकास आघाडीने विजयाचे गणित मांडले होते. मात्र, निवडणुकीच्या ऐन रंगात महाविकास आघाडीतीलच काही मते फुटण्याची शक्यता निर्माण झाली. पराभवाची संभाव्य नामुष्की टाळण्यासाठी अखेर मविआचे उमेदवार अभिजित पवार यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. परिणामी, ही निवडणूक आता पूर्णपणे बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

20
4137 views

Comment