logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*श्रीरामपूर रेल्वे स्थानकात मृतदेह आढळला;शहरात खळबळ*


*श्रीरामपूर रेल्वे स्थानकात मृतदेह आढळला;शहरात खळबळ*

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)– बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्थानकाच्या बुकिंग परिसरासमोर ५० ते ५५ वर्षीय एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.लोहमार्ग पोलीस हवालदार दीपक सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या व्यक्तीबाबत माहिती असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्थानकाच्या बुकिंग परिसरासमोर एक अनोळखी इसम अचेत अवस्थेत पडलेला आढळून आला.सदर अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे असून उंची सुमारे ५ फूट ५ इंच आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीचा रंग गोरा असून केस पांढरे व दाढी वाढलेली आहे. अंगात आकाशी रंगाचे टी-शर्ट, आतून राखाडी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट,गळ्यात पांढरे उपरणे,पॅन्ट गडद निळ्या रंगाची तसेच अंगडेवर काळ्या रंगाची ‘DIXCY SCOTT’ कंपनीची अंडरवेअर परिधान केलेली आहे.उजव्या कपाळावर जुन्या जखमेची खूण आहे. सदर व्यक्तीबाबत कोणास माहिती असल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

5
78 views

Comment