logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

उमरगा येथे २४ वी ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय निवड चाचणीत १४० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

उमरगा येथे २४ वी ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय निवड चाचणीत १४० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

उमरगा, महंमदरफी शेख : धाराशिव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली २४ वी ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठीची निवड चाचणी रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, उमरगा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या निवड चाचणीत जिल्हाभरातील १४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या क्रिकेट कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यामध्ये १०० मुलं आणि ४० मुली सहभागी झाल्या होत्या. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलं व मुली या दोन्ही गटांतील खेळाडूंची निवड करण्यात आली.

मुलांच्या गटातून निवड झालेले खेळाडू

रिहान तुगावकर, समर्थ स्वामी, श्री भोसले, शिवदर्शन शिंदे, वेदांत गायकवाड, रुद्र राठोड, संस्कार नागडे, संकेत पवार, यश पैलवान, साईओम चरंकर, पृथ्वी गरड, पवन माने आणि इस्माईल नादाफ.

मुलींच्या गटातून निवड झालेल्या खेळाडू

श्रावणी भोसले, माही सय्यद, हर्षदा सूर्यवंशी, श्रावणी पाटील, आरुषी सखारे, किरण सोमकांबळे, अनोखी एरंडे, अस्मिता भोसले, श्रेया अंकुश, गीता गायकवाड, झोया मोमिन, प्रणिता सूर्यवंशी आणि आनंदी कांबळे.

निवड झालेल्या खेळाडूंना दि. ४ ते ६ जून २०२६ दरम्यान छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय, उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील संघ या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

निवड प्रक्रियेदरम्यान खेळाडूंची तांत्रिक कौशल्ये, शारीरिक क्षमता, खेळातील शिस्त आणि एकूण कामगिरीच्या आधारे अंतिम संघाची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल, उमरग्याचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. निवड चाचणीस विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धाराशिव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा सचिव महमदरफी शेख यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले, "अशा निवड चाचण्यांमुळे होतकरू खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळते. क्रिकेट क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या खेळाडूंनी अशा संधींचा लाभ घेत सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे."

अमन स्पोर्ट्स क्लब आणि धाराशिव जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अधिकाधिक खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव गौरवास्पद करण्याचे आवाहन करण्यात आले.

या निवड चाचणीस प्रशिक्षक प्रथमेश पोद्दार तसेच राष्ट्रीय खेळाडू नासिर बांगी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन होत असून, त्यांच्या यशस्वी कामगिरीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 🏏🏆

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

4
67 views

Comment