logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

मालाड पश्चिम : युवक संघटनेत पदाधिकारी सन्मानित

मालाड पश्चिम : काल संध्याकाळी 4 वाजता मराठी शाळेत युवक संघटनेची सभा पार पडली. या सभेत शिर्डी वर्धापनदिनाच्या दिवशी उपस्थित नसलेल्या सभासदांचे पुरस्कार वाटप करण्यात आले. तसेच नवीन पदाधिकारी आणि सदस्यांना संघटनेचे सर्टिफिकेट व आयडी कार्ड देण्यात आले.

कार्यक्रमात मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिताताई बांद्रेकर यांना महाराष्ट्र महिला अध्यक्षा म्हणून आणि सौ. जसविंदर सिंग राणा यांना मुंबई महिला उपाध्यक्ष तसेच ठाणे जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश वाघ, मुंबई युवा अध्यक्ष श्री. कुणाल शहा, मुंबई सचिव श्री. सोहराब मुजावर, महिला सचिव सौ. सुरेखा मेहेर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मिराभायंदरच्या डॅशिंग नेतृत्व राधाताई शेट्टी यांनी संघटनेबाबत मार्गदर्शन केले आणि सदस्यांना मदतीच्या बाबतीत सूचना दिल्या.

17
853 views

Comment