logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमध्ये संकेत कदम व सनी पाटोळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमध्ये पै. संकेत भाऊ कदम आणि पै. सनी भाऊ पाटोळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी तालमीतील खेळाडू, पैलवान, प्रशिक्षक तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करत सर्वांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी व क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला वस्ताद जटप्पा लोणार आप्पा, पै. बाळासाहेब पडघम भाऊ डबल महाराष्ट्र केसरी, वस्ताद अनिल माने, वस्ताद तात्या शेळके, पै. मदने, वस्ताद सलीम चाच्या, पै. मनोहर पाटील, कदम वस्ताज तसेच सोमाशेठ सावंत सरपंच राजु साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी वाढदिवस साजरा करताना खेळाडूंना शिस्त, मेहनत आणि जिद्दीचे महत्त्व सांगितले. तसेच कुस्ती आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात संकेत कदम व सनी पाटोळे यांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण वातावरण उत्साह, आनंद आणि आपुलकीने भरून गेले होते. या सोहळ्यामुळे प्रबोधिनीतील सर्व खेळाडू व पालकांमध्ये एकात्मतेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

25
1498 views

Comment