गडचिरोलीत नवीन वाहतूक व्यवस्थेची मागणी यशस्वी
पोलीस बॉईज संघटनेच्या मेहनतीला यश, कोर्ट चौक व आयटीआय चौकात सुरू झाले ट्रॅफिक सिग्नल
गडचिरोली |
📰 गडचिरोलीत नवीन वाहतूक व्यवस्थेची मागणी यशस्वी
पोलीस बॉईज संघटनेच्या मेहनतीला यश, कोर्ट चौक व आयटीआय चौकात सुरू झाले ट्रॅफिक सिग्नल
📍 गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले होते. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियंत्रण व्यवस्था नसल्याने सतत वाहतूक कोंडी होत होती तसेच अपघातांचे प्रमाणही वाढत होते. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही जनसमस्या लक्षात घेऊन पोलीस बॉईज संघटनेने प्रशासनासमोर आवाज उठवला होता. संघटनेचे पदाधिकारी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते.
संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि जनहिताच्या मागणीला अखेर यश आले असून गडचिरोली शहरातील कोर्ट चौक तसेच आयटीआय चौक येथे ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात आले आहेत. सिग्नल सुरू झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमाचे श्रेय राहुल दुबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत संपूर्ण टीमला दिले जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप पेदापल्ली, उपाध्यक्ष रोशन कवाडकर, जिल्हाप्रमुख अनुराग कुडकावार, यांच्यासह पोलीस बॉईज संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा फक्त ट्रॅफिक सिग्नल सुरू होण्याचा विषय नसून सामान्य नागरिकांच्या आवाजाचा विजय आहे. भविष्यातही शहर व जिल्ह्यातील विविध जनसमस्यांबाबत प्रशासनापर्यंत जनतेचा आवाज पोहोचवण्यासाठी पोलीस बॉईज संघटना कार्यरत राहील.
🎯 निशाणा
“जनतेच्या समस्या मांडणारी संघटना हीच समाजाची खरी ताकद असते.”
न्युज रिपोर्टर राजकुमार माहवे
गड़चिरोली महाराष्ट्र