logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

दुचाकी चोऱ्या वाढल्या, ३ मोटारसायकलची चोरी





जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून

मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, २७ मे रोजी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या तीन दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आंली आहे.

काव्यरत्नावली चौक परिसरात असलेल्या एका जिमच्या बाहेरून हितेश संतोष पाटील या युवकाची दुचाकी २० मे रोजी चोरीला गेली. हितेशने रामानंदनगर पोलिसांत अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे विभागाच्या 'एसएनटी' कार्यालयासमोरून दि.२५ रोजी हेमंत रमेश चौधरी या युवकाची दुचाकी चोरी झाली आहे. तिसरी घटना नवीपेठ परिसरात घडली. २३ ते २५ मे दरम्यानच्या काळात सोनल राधेश्याम यांची दुचाकी नवीपेठेतून चोरीला गेली. या प्रकरणी देखील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19
1094 views

Comment