भिवापूर : एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
भिवापूर : बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा उमरेड यांच्या वतीने महापुरुषांच्या जयंती निमित्त 31 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात समस्त बहुजन बंधू भगिनींना सहभागी होण्याचे आग्रहाने निमंत्रण देण्यात आले आहे ज्यामुळे त्यांना महत्वाची माहिती मिळू शकेल.
शिबिराचे उद्घाटक मा. साबीर पटेल, पत्रकार, भिवापूर असतील. याशिवाय मा. अरुण कुमार तालेवार, सामाजिक कार्यकर्ता; मा. प्रशांत गायकवाड, ब स पा सचिव; मा. महेश डडमल, अध्यक्ष शिवसेना नागपूर जिल्हा; मा. राहुल तांबे, सामाजिक कार्यकर्ता वळद (भिवापूर); मा. कृष्णाजी घोडेस्वार, माजी सभापती पंचायत समिती भिवापूर; आणि मा. सदिंप खडसंग, माजी नगरसेवक भिवापूर उपस्थित राहतील. प्रशिक्षणाचे संचालन मा. डॉ. प्रा. सुभाष सोमकुवर, अध्यक्ष इंडियन इंडिजिनस सोसायटी ऑफ सोशल सायन्सेस करणार आहेत. शिबिराचा ठिकाण बहुजन सहकारी पत संस्था, भिवापूर कार्यालय, वरचा माळा, गुजरी रोड, भिवापूर आहे.