logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*प्रतिभा निकेतन हायस्कूल आणि प्रज्ञा निकेतन हायस्कूल, होळी नांदेड येथील सन १९७९-८० च्या दहावीतीलविद्यार्थी-विद्यार्थिनींच्याभव्यस्नेहसंमेलन संपन्न .


*प्रतिभा निकेतन हायस्कूल आणि प्रज्ञा निकेतन हायस्कूल, होळी नांदेड येथील सन १९७९-८० च्या दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या भव्य स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नांदेडचे ज्येष्ठ समाजसेवक, धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. तब्बल चार दशकांनंतर बालपणीचे मित्र-मैत्रिणी एकत्र आल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यावेळी अॅड. दिलीप ठाकूर यांनी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी रोख बक्षिसे देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या प्रेरणादायी सूचनेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकारात्मक सहमती दर्शविली.*

रविनगर येथील आरंभ बँक्वेट हॉलमध्ये पार पडलेल्या या स्नेहसंमेलनामुळे संपूर्ण परिसरात आनंद, आठवणी आणि भावनिक जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले होते. देश-विदेशातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा विशेष संस्मरणीय ठरला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित व्यापारी पांडुरंग कन्नावार होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रारंभी व्यंकटेश जिंदम यांनी प्रास्ताविकातून सन १९८० च्या ग्रुपच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या मैत्रीबंधाचा, एकोप्याचा आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षणाधिकारी अॅड. श्रीपाद यशवंतराव देशपांडे, व्यंकटेश जिंदम, लक्ष्मीकांत गज्जेवार, नंदकिशोर झोळगे, देवेंद्रजी देशमुख, छायाताई माळवतकर, डॉ. उर्मिला मुंदडा आणि वसुधा कंधारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहभागींचे स्वागत, नावनोंदणी, नाश्ता आणि चहापानानंतर उद्घाटन सोहळ्यास प्रारंभ झाला. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना अॅड. दिलीप ठाकूर यांनी शालेय जीवनातील अनेक रंगतदार, खुसखुशीत आणि भावनिक आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणी सांगताना सभागृहात अनेकदा हास्यकल्लोळ उसळला. याचवेळी त्यांनी नवीन पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आस्था, स्पर्धात्मकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी यासाठी या ग्रुपतर्फे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्याची सूचना केली. त्यांच्या या विचारांचे उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
उद्घाटनानंतर सर्व सहभागींचा नवपरिचय कार्यक्रम पार पडला. अनेक मित्र-मैत्रिणी तब्बल ४५ वर्षांनी एकमेकांना भेटत असल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळताना दिसत होते. स्नेहसंमेलनात महिला व पुरुषांसाठी विविध रंगतदार आणि मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरणात विशेष उत्साह संचारला होता.

मध्यंतरात खास पारंपरिक “धोंडे आणि आमरस” भोजनाचा सोहळा पार पडला. सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भोजनाचा आनंद घेतला.यानंतर विविध कला गुणदर्शनाचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. माजी शिक्षणाधिकारी अॅड. श्रीपाद यशवंतराव देशपांडे यांनी स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. देवेंद्र देशमुख यांनी खरमुरे विक्रेत्याच्या अभिनव आणि विनोदी सादरीकरणातून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. श्रीनिवास देशमुख, नंदकिशोर झोळगे, लिला जाजू, विलास गायकवाड आणि सुशिला पालीमकर यांनी सुमधुर गीते सादर करून वातावरण संगीतमय केले.
वर्षा पाटसकर आणि सुधा टोके-जोशी तामसेकर यांनी इयत्ता पहिली ते दहावी तसेच बालवाडीत शिकलेल्या लोकप्रिय कविता सादर करत सर्वांना थेट बालपणात घेऊन गेले. त्यांचे सादरीकरण विशेष बहारदार ठरले.

संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते नांदेड येथील सिनेकलावंत सुनील बागडे यांचे बहारदार कथ्थक नृत्य सादरीकरण. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी आणि ओघवते सूत्रसंचालन वर्षा पाटसकर, सुशिला पालीमकर आणि प्राध्यापक स्वाती चौधरी यांनी केले. अधिक मासानिमित्त सर्व उपस्थितांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेवटी अरुणा कुरूमभट्टे यांनी आभार प्रदर्शन केले.

या भव्य स्नेहसंमेलनासाठी जपान, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा तसेच बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, सोलापूर, हिंगोली, परभणी आणि नांदेड येथून मित्र-मैत्रिणींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नांदेड शहरातील जेष्ठ उद्योजक दीपक भोरे, प्रतिष्ठित व्यापारी राजेश बच्चेवार, राजगोपाल पल्लौड, बालवीरसिंग जहागीरदार, गणेश देशपांडे आणि श्रीनिवास देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरला.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
134 views

Comment