logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील सदस्य ०४ कट्टे,१० जिवंत काडतुसासह नगरला धरले*

*पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील सदस्य ०४ कट्टे,१० जिवंत काडतुसासह नगरला धरले*


नगर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)
याबाबत अधिक माहिती अशी की,दिनांक २६/०५/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांना मिलिट्री इंटेलिजेन्स, साउथ कमांड, अहिल्यानगर इनपुट, यांचेकडुन मिरावली पहाडाचे पायथ्याजवळ, बुऱ्हानगर रोड, भिंगार, ता. जि. अहिल्यानगर या ठिकाणी काही इसम अग्नीशस्त्रासह दरोडा घालण्याचे तयारीत थांबलेले असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करुन बातमीतील ठिकाणी कारवाई करणे कामी रवाना करण्यात आले.पथकाने बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी ०५ इसम संशयीतरित्या उभे असल्याचे दिसुन आले. पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना त्यातील एक इसम मोटार सायकलवर भरधाव वेगात पळुन गेला.पथकाने उर्वरीत इसमांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले असुन ताब्यातील इसमांना त्यांचे नांव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे (१) मुस्ताक ईक्राहीम शेख,वय २२ वर्षे, रा. कोंढवा, आश्रमनगर, पुणे, (२) विराट उर्फ विल्यम रविंद्र मेहंदळे,वय २६ वर्षे, रा.काकडे वस्ती, कोंढवा, पुणे, (३) समर्थ बाबासाहेब माडळकर,वय १९ वर्षे, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे, (४) समर्थ राजेंद्र दुधभाते वय १८ वर्षे, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमाबाबत विचारपुस करता इसम नामे विराट रविंद्र मेहंदळे याने पळुन गेलेल्या इसमाचे नांव (५) आकाश संजय पवार रा. ब्रम्हतळे,रा. भिंगार,ता. जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.आरोपींचे अंगझडतीत ०१ गावठी कट्टा, ०१ जिवंत काडतुस, कोयता, चाकु, मोबाईल असा एकुण १,७१,०००/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुध्द अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. २८८/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१० (५), सह आर्म अॅक्ट कायदा कलम ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचेकडे देण्यात आला आहे.
गुन्ह्याच्या तपासामध्ये वरील आरोपी क्रमांक १ ते ४ यांना अटक करण्यात आलेली असुन न्यायालयाने त्यांची ०३ दिवस पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेत असतांना आकाश संजय पवार रा. ब्रम्हतळे, रा. भिंगार, ता. जि. अहिल्यानगर हा मिळुन आला असुन तपासामध्ये आरोपीकडुन १,५०,०००/-रु कि.चे ०३ गावठी कट्टे, ९०००/-रु कि.चे ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहे. वरील प्रमाणे कारवाईमध्ये १,९०,०००/-रु कि.चे एकुण ०४ गावठी कट्टे, १०,०००/-रु कि.चे १० जिवंत काडतुसे, कोयता, चाकु, मोबाईल असा एकुण २,७६,०००/-रु कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन अधिक तपास चालु आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी हे पुणे येथील कुख्यात आंदेकर टोळीतील असुन त्यांचेविरुध्द यापुर्वी पुणे शहरामध्ये खुन, शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे.आरोपी नामे समर्थ बाबासाहेब मांडळकर याचेविरुध्द पुण्यात ०५ गुन्हे दाखल आहेत. आरोपी नामे समर्थ राजेंद्र दुधभाते याचेविरुध्द पुण्यात ०३ गुन्हे दाखल आहेत.तसेच आरोपी नामे आकाश संजय पवार याचेविरुध्द नगर शहरात ०२ गुन्हे दाखल आहेत.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
110 views

Comment