logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या विशेष पथकाने धाडसी कारवाई या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले



स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांच्या विशेष पथकाने धाडसी कारवाई करत संशयित आरोपीस ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
दिनांक २४/०५/२०२६ रोजी १७.३० वा. ते २३.०० वा.चे सुमारास मासुलकी नावाचे शेतात
कोलोली ता.पन्हाळा जि. कोल्हापूर येथे मयत छबुताई सर्जेराव पाटील वय ५५ वर्षे रा.कोलोली
ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या शेतात काम करत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात
कारणाकरीता कोणत्यातरी धारधार शस्त्राने हातावर, डोक्यावर वार करुन गंभीर जखमी करुन ठार
मारबाबत फिर्यादी बाबासो श्रीपती पाटील रा. कोलोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर यांचे फिर्यादी
जबाबावरुन पन्हाळा पोलीस ठाणेगु.र.नं. ११८/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ ( १ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल सो यांनी सदर गुन्हयातील
आरोपीचा सत्वर शोध घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सुचना दिल्या होत्या.
मा. पोलीस अधीक्षकसो, यांनी दिले सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षकसुशांतचव्हाण यांनी
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष गळवे व स्थानिक गुन्हे
अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत मोरे , गजाननगुरव , महेंद्र कोरवी ,
विनोद कांबळे, हिंदुराव केसरे , युवराज पाटील, महेश आंबी यांचे पथक तयार करुन आरोपींचा शोध घेणेस सुरवात केली .
सदर गुन्हा घडले ठिकाण हे शेतातमध्ये गावापासुन दुर्गम ठिकाणी असल्याने सदर ठिकाणी
गुन्ह्याचा छडा लावुन उघडकीस आणणे पोलीसांना आव्हानात्मक असे होते. वर नमुद पोलीस अधिकारी
व अंमलदार यांनी सदर ठिकाणाची बारकाईने पाहणी करुन, माहिती घेवुन गोपनिय बातमीदार यांना
पाचारण करुन त्याव्दारे तपास केला असता गोपनिय बातमीदार, तांत्रीक व परिस्थीतीजन्य पुरावे
यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक श्री.संतोष गळवे व पोलीस
अंमलदार सचिन जाधव ,अनिकेत मोरे यांना माहिती मिळाली की , सदरचा गुन्हा हा अंकुश हणमंत
पाटील रा.कोलोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर याने केला असून त्यास गुन्ह्याचे तपासकामी
दि.२६/०५/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे
बोलावुन घेवुन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण कौशल्यपूर्ण
चौकशी केली असता त्याने रात्री उशिरा गुन्ह्याची कबुली देवुन त्याने सांगीतले की, मयत महिला नामे
छबुताई सर्जेराव पाटील हिचेवर अतिप्रसंग करणेचा प्रयत्न करीत असताना मयत हिने प्रतिकार केला,
म्हणुन त्याने मयतेचे डोक्यावर व हातावर वार करुन गंभीर जखमी करुन ठार मारलेचे सांगीतले.
आरोपीनामे अंकुश हणमंत पाटील वय ५१ वर्षेरा. कोलोली त.ा पन्हाळा जि. कोल्हापूर यास गुन्हयाचे
पुढील तपास कामी पन्हाळा पोलीस ठाणेच्या ताब्यात देणेत आले आहे .
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल सो, मा. अपर पोलीस
अधीक्षकश्री. आण्णासाहेबजाधवसो , मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री आप्पासाहेब पवार यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकसुशांतचव्हाण, पोलीस निरीक्षक श्री .नामदेव शिंदे , सहाय्यक पोलीस
निरीक्षकश्री.सागरवाघ , पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोषगळवे , पोलीस उपनिरीक्षक श्री. लक्ष्मण सरगर,
पोलीस अंमलदार सचिन जाधव, अनिकेत मोरे , गजाननगुरव, महेंद्र कोरवी, हिंदुराव केसरे , युवराज
पाटील, महेश आंबी , राम कोळी, विनोद कांबळे , अमित सर्जे, विशाल खराडे , संदिप बेंद्रे, अनिल
जाधव, समीर मुल्ला, तौसीफ मुल्ला, प्रविण बोरचाटे, शहाजी फोंडे यांचे पथकाने केलेली आहे .

2
501 views

Comment