सामान्य माणसांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने तहसिलदारांना निवेदन
सामान्य माणसांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने तहसिलदारांना निवेदन
प्रतिनिधी : शेखर जाधव
मेढा :- सामान्य माणसांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचेवतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली आज जावलीचे तहसिलदार यांना पक्षाचे विधानसभा अध्यक्ष सुरेश पार्टे यांचे नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्षा सौ. रुपालीताई भिसे, पंचायत समिती सदस्या सौ. शिल्पा शिंदे, मेढा नगरपंचायतीच्या नगरसेविका कु. प्राजक्ता पार्टे, नारायण शिंगटे, विठ्ठल पवार, प्रकाश कदम, राम कदम, संजय जुनघरे, अँड. निलीमा मोरे, संजय कदम, कोंडीबा पवार, रणजित पाटील इत्यादी मान्यवार उपस्थीत होते.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जावली तालुका यांच्या वतीने नम्र निवेदन करतो की, गेले बारा वर्ष केंद्र सरकारमध्ये भाजप प्रणित घटक पक्षाची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून अक्षरशा भारतीय नागरिकांचे जगणे मुश्किल केलेले आहे. प्रत्येक दिवशी सूर्य महागाई वाढ झाल्याचे बातमी देऊनच उगवतो. नियोजन अभावी महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांच्या मानगुंटीवर बसला आहे. केंद्र व राज्य सरकार बेरोजगारी रोखण्यात अपयशी ठरले आहे. संध्याकाळी मावळताना केंद्र सरकारच्या मालकीच्या असलेल्या एखाद्या कंपनी मावळत आहे. राष्ट्रीयकृत कंपन्या सरकारी राहिली नसून ती खाजगीकरणाकडे गेल्याचे दिसून येत आहे. महिला विधेयकाच्या नावाखाली भाजपने रचलेले षडयंत्र नुकतेच विशेष अधिवेशनात हाणून पाडलेले आहे. त्यामुळे सत्तेसाठी साम-दाम-दंड-भेद व पक्षप्रवेश असा फॉर्मुला भाजप वापरत आहे. याला तीव्र विरोध करण्यासाठीच हे निवेदन आहे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आहे. पोक्सो, बलात्कार, खून दरोडयासारख्या वाढत्या गुन्हांची संख्या म्हणजे गृहखात्याचे अपयश आहे. अल्पवयीन मुलींवर बलात्कार होत आहे.तर दुसऱ्या बाजूला मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून सुद्धा पोलीस यंत्रणा तपास कामांमध्ये कुचराई करत आहे. महिलांचे सिंदूर नव्हे तर मंगळसूत्र सुद्धा सुरक्षित राहिलेले नाही. राज्य सरकारने स्मार्ट मीटरच्या नावाखाली सामान्य जनतेची सध्या लूट सुरु आहे. ती थांबवावी व स्मार्ट स्मीटर बसविणे सक्ती रद्द करावी. कृषी, सिंचन, पाणीपुरवठा सारख्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणेसाठी सरकार अपयशी ठरले आहे. संपूर्ण देशामध्ये इंधन भाववाढ त्याचबरोबर इंधनाचा तुटवडा सुरू आहे. नोटाबंदीनंतर देशामध्ये किती काळा पैसा आला? याचा अद्याप हिशोब लागलेला नाही. निर्यात बंदीमुळे भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कांदा निर्यातीवर बंदी आल्यामुळे मातीमोल भावाने कांदा गोदामामध्ये सडून जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेलेडी घेऊन आनंद साजरा करत आहेत. नीट पेपर फुटीमुळे देशातील २३ लाख
विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. दररोज १२ तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे बारा वाजलेले आहेत. तरीही शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही. एवढे निरडावलेले राजकारणी कधीही जगाने पाहिले नाही. उपवर्गीकरणाचे खुळ आणून फोडा आणि संघाशी जोडा असा उपक्रम राबवला जात आहे. एवढेच नव्हे तर महायुतीमधील पक्षाला सुद्धा गिळंकृत करण्यासाठी राजकारण केले जात आहे. मंत्र्यांना सुद्धा आता पोलीस अडवू लागलेले आहेत. सर्वसामान्य माणसांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊन खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे.
दुसऱ्या बाजूला निकृष्ट दर्जाच्या महामार्गाच्या कामामुळे अनेक अपघात घडून जीवित हानी झाली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री सुद्धा ठेकेदारांपुढे हतबल झाल्याचे दिसून आलेले आहे. तसेच राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या जाचक अटी काढून टाकून सरसकट कर्जमाफी दिली पाहीजे.तरी या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की वरील सर्व बाबींचा विचार करून या सरकारने तातडीने सामान्य जनतेला दिलासा द्यावा.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तरी या निवेदनाद्वारे आम्ही आपणास विनंती करतो की वरील सर्व बाबींचा विचार करून या सरकारने तातडीने सामान्य जनतेला दिलासा द्यावा.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदना वरती उपस्थीत पदाधिकाऱ्यांच्या सहया आहेत. आपल्या भावना वरीष्ठ पातळीवर पोहचविण्याचे काम केले जाईल असे आश्वासन यावेळी तहसिलदार प्रविण मुगदुल यांनी दिले.फोटो तहसिलदार प्रविण मुगदुल यांना निवेदना देताना सुरेश पार्टे, शिल्पा शिंदे, रूपाली भिसे, प्राजक्ता पार्टे, अॅड निलीमा मोरे, प्रकाश कदम,नारायण शिंगटे, विठ्ठल पवार,राम कदम, संजय जुनघरे व मान्यवर