वाशिममध्ये पीक विमा घोटाळा; शेतकरी न्यायालयाकडे जाण्याचा इशारा
वाशिम: जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे ७०% नुकसान झाले असूनही विमा कंपन्या आणि प्रशासन शेतकऱ्यांशी अन्याय करत आहेत. पिक विमा क्लेम नाकारण्यात येत असून, अधिकाऱ्यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहितीही अद्याप दिलेली नाही. तारखेडा येथील शेतकरी महेश काळखे यांनी या प्रकरणी माहिती अधिकारात पीक कापणी अहवाल आणि क्लेमसंदर्भात माहिती मागितली होती, मात्र महसूल विभागाने ३० दिवसांनीही उत्तर दिलेले नाही.
शेतकऱ्यांना सेंद्रिय कर्बाच्या घटामुळे शेतीसंबंधी गंभीर समस्या भासत आहेत. प्रशासनाचा दडपशाही व विमा कंपन्यांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या संकटात भर घालत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल करून दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आली असून, प्रशासनाने न्याय न दिल्यास शेतकरी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.