जेएनपीएने बदलले पनवेल - उरणवासीयांचे जीवनमान
ठाणे : जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीज (JNPA) न्हावा शेवा बंदरामुळे पनवेल, नवी मुंबई आणि उरण विभागाचा औद्योगिक व पायाभूत विकास झाला आहे. या बंदरामुळे स्थानिक रोजगार, वाहतूक व्यवस्था आणि नागरीकरण यामध्ये मोठी वाढ झाली आहे. जेएनपीए आता पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील महत्वाकांक्षी बंदर प्रकल्प हाती घेत असल्यामुळे पालघर जिल्ह्याचा देखील कायापालट होणार आहे.
उरण आणि पनवेल परिसरात वेअर हाउसेस, कंटेनर डेपो (CFS) आणि विविध उद्योगांचे जाळे निर्माण झाले आहे. लाखो अप्रत्यक्ष रोजगार आणि व्यवसाय संधी निर्माण झाल्या असून, रस्ते, रेल्वे आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये सुधारणा झाली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणामुळे कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळाला व त्याचा मोबदलाही मिळाला आहे. आर्थिक व शैक्षणिक स्तर वाढल्याने परिसराचा समग्र विकास झाला आहे. जेएनपीएच्या विस्तारामुळे पालघर जिल्ह्यातही अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.