मुंबई: अब्राहम मथाई कुटुंबीयांच्या गंभीर तक्रारींमुळे अडचण वाढली
मुंबई: हार्मोनी फाउंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि आरोपांमुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर मथाईंच्या संपूर्ण कुटुंबीयांनी पोलिसांकडे गंभीर तक्रारी केल्या असून यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक आणि विविध पोलीस आयुक्तांकडे या तक्रारी पाठविण्यात आल्या आहेत आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मथाईंच्या मुलगा, मुलगी, पत्नी आणि सुनेने धमकी, खंडणी मागणे, आणि शारीरिक इजा पोहचविण्याचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांशी असलेल्या सोशल मिडिया चॅटिंगचा आधार घेऊन फसवणूक आणि धमकावणीचे आरोप केले आहेत. याशिवाय मथाईंच्या मुलगा अरोन मथाई, जेन्सी, जोडायस, आणि मराठी अभिनेत्री दमोहा यांच्याविरुद्ध अन्याय, अत्याचार व शोषणाबाबत चौकशी करण्यासाठी तक्रार महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. हा प्रकरण सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय आहे.