logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

युवा क्रांती फाऊंडेशनचा चौथा वर्धापन दिन सोहळा शिर्डीमध्ये

शिर्डी : युवा क्रांती फाऊंडेशनचा चौथा वर्धापन दिन सोहळा 21 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभासदांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवास संदर्भात प्रत्येक तालुक्याचा अध्यक्ष सभासदांच्या प्रवासाची माहिती रेल्वे, बस किंवा प्रायव्हेट गाडीने येण्याबाबत ग्रुपमध्ये पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

निघण्याची तारीख 20 मे 2026 असून सर्वांनी शांतता आणि शिस्तीत प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान कोणतीही धिंगामस्ती किंवा मजाकबाजी करू नये, तसेच महिला सदस्यांसाठी आदर राखण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. संमती पत्र, आयडी कार्डांचे वाटप आणि रिन्यू करण्याबाबतच्या सूचना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अशोक पुंडेराम जोशी यांनी सभासदांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती केली आहे.

24
1976 views

Comment