logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आदिवासी टायगर सेना ची भेट

एक दिवसीय अभ्यास दौरात आदिवासी समाजाच्या विविध समस्या ची घेतली माहिती*

प्रतिनिधी,
आकाश गेडाम

डॉ. प्रकाश आमटे ह्यांनी १९७३ साली सुरू केलेल्या खडतर प्रवासाची माहिती घेणे व त्यांनी रोवलेले रोपटे आज महावृक्ष म्हणून खंबीर उभे आहे ह्याची माहिती घेण्यासाठी आदिवासी टायगर सेना च्या वतीने एक दिवसीय अभ्यास दौरा घेण्यात आला.
आजही अनेक गावात जायला रस्ते नाही, स्वछ पाणी नाही, मुलभूत सुविधा नाहीत अशा परिस्थिती मधे आदिवासी जीवन जगत आहेत. अनेकांना तिथे जाऊन काम करायची इच्छा सुद्धा होत नाही त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कुणी प्रयत्न करतांना दिसत नाहीत हे दौरा दरम्यान लक्ष्यात आले . तर १९७३ साली इथे काय परिस्थिती असेल ? त्या काळात जे काही कार्य डॉ.प्रकाश आमटे व त्यांच्या सहकाऱ्यानी केले ते दैवीरूप आहे ,असे मत आदिवासी टायगर सेना च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
आदिवासी टायगर सेना ची सर्व टीम डॉ प्रकाश आमटे व त्यांच्या सहकार्या सोबत चर्चा केली. त्यांना आलेले अनुभव व त्यांचे प्रयत्न ह्याची माहिती मनोहर इप्पलवार ह्यांनी आदिवासी टायगर सेना च्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
त्रिवेणी संगम भामरागड येथे आदिवासी टायगर सेना ची एक बैठक घेण्यात आली. त्यात डॉ प्रकाश आमटे ह्यांच्या केलेल्या कामाची प्रेरणा घेत आदिवासी समाजाच्या प्रत्येक अडचणी व समस्या दूर करण्यासाठी काम करायची प्रेरणा मिळाली असे मत एड.संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष आदिवासी टायगर सेना ह्यांनी बोलून दाखवले. आधीही व आताही आदिवासी समाज शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी झाला तर त्याचे राहणीमान व सर्वांगीण विकास उंचावेल त्या साठी आपल्या समाजाच्या मुलांनी योग्य व गुणवत्ता पूर्ण शिक्षण घ्यावे ह्या साठी आदिवासी टायगर सेना च्या वतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल असे मत प्रा.योगिता शेडमाके विदर्भ महासचिव ह्यांनी व्यक्त केले .आदिवासी आमदार विविध पक्षात आहेत. त्यांनी सामाजिक हित जपत विविध राजकीय पक्षांत काम करून त्यातून राजकीय फायदा आपल्या समाज बांधवांना कसा मिळवून देता येईल ह्यावर विचार केला पाहिजे ,असे होत नसेल तर भविष्यात आदिवासी टायगर सेना च आमच्या आमदारांच्या विरोधात उभी राहील . असे मत मोरेश्वर उईके ह्यांनी व्यक्त केले
विदर्भप्रांतात आदिवासी टायगर सेना ही लोकांच्या प्रश्नांवर औषध मनुन काम करत असल्याने झपाट्याने समाज बांधवाच्या मनात घर निर्माण करत आहे . गेल्या एक महिन्यांत १००० सदस्य विविध जिल्ह्यांत जोडले गेल आहे . त्या मूळ अनेक आपली दुकानदारी चालवणारे काही सामाजिक कार्यकर्ते समाज माध्यमांवर अप्रचार सुद्धा सुरू केल्याचे काही दिवसा आधी बघितले आहे.त्या साठी आपल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ह्यांनी आपले काम प्रामाणिक केले पाहिजे. कुठल्याही कारणाने आपल्यावर डाग लागेल असे वागू नये. संघटना मधे चांगले काम करणारे समाज बांधव जोडले पाहिजे . भविष्यात शिक्षण, रोजगार, व इतर विविध क्षेत्रात आपले विद्यार्थी कसे यशस्वी होतील ह्या कडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे असे मत प्रा प्रियदर्शन मडावी जिल्हा अध्यक्ष गडचिरोली ह्यांनी व्यक्त केले. अभ्यास दौऱ्यात प्रामुख्याने आकाश गेडाम, वैभव कुसनाके, श्रेयस गेडाम, भरत उइके, वर्षा आत्राम, प्रगती प्रभूदास, सुमित्रा आलाम, सोज्वळ कुमरे, अर्चना उईके, वर्षा आत्राम, सागर मेश्राम, नितीन सिडाम, जया पुडो, बेबी हेडो, अंजली कोंदो, नंदा हेडो, प्रतिभा मडावी, विना तोडासे, संगीता सिडाम, रेखा सोरते, रीता मडावी, वैशाली भलावे, चंदा आत्राम रेखा तोडासे, संगीता कोरचे, रुंदा कुळमेथे, गीता पंधरे, बॉबी येलके, पुष्पा मेश्राम, प्रशांत निमसरकर, पवन कुलसंगे, प्रेमदास सिडाम, अरुणभाऊ येडमे, अविनाश वाडके, हिना परचाके, ताई मेश्राम, पूनम कुळमेथे, गणेश कोवे, कालिदास नगराडे राजेंद्र शेरकी, सह शेकडो स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते,बैठकीचे सूत्रसंचालन ड्रेफूल आत्राम जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर तर आभार प्रदर्शन हरिप्रसाद गेडाम तालुका महासचिव भद्रावती ह्यांनी केले .

5
616 views

Comment