logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

प्राणी मित्र चैताली भस्मे यांचा साईनगरी शिर्डी येथे महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्काराने सन्मान

*प्राणी मित्र चैताली भस्मे यांचा साई नागरी शिर्डी येथे भव्य सत्कार* ओम साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्दमाने परिवार लॉन्स व बँकेट हॉल साईनगरी शिर्डी येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या समारंभात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशिष्ट व्यक्तींचा सन्मान करण्यात आला मनीष नगर नागपूर येथील विषारी सापांपासून शेकडो लोकांचे जीव वाचवणाऱ्या तसेच मुक्या शेकडो जीवांना जीवनदान देणाऱ्या महिला सर्पमित्र प्राणीमित्र वन्यजीव रक्षक व मांगल्य फाऊंडेशन च्या संस्थापिका चैताली भस्मे यांच्या समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल " महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार 2026 " देऊन सन्मानित करण्यात आले 2005 पासून ते आजपर्यंत अखंड निस्वार्थ समाजसेवा,प्राणिसेवा , आणि निसर्ग सेवेसाठी चैताली भस्मे यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक , सुदाम संसारे ,प्रमुख अतिथी किशोर कालडा, ऍडव्होकेट सतीश चंद्र सुद्रिक ऍडव्होकेट दिलीप शेषराव वाघ, सौ सुमन देसाई, सौ वैशाली सोनवणे इत्यादी उपस्थित होते

11
799 views

Comment