logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*"NEET UG 2026 परीक्षेच्या पेपर लीक व केंद्र सरकारच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ निदर्शने व जिल्हाधिकारी यांना निवेदन*

*"NEET UG 2026 परीक्षेच्या पेपर लीक व केंद्र सरकारच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ निदर्शने व जिल्हाधिकारी यांना निवेदन*

*धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस व धाराशिव जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेस [NSUI] च्या वतीने आज दिनांक 18 मे 2026, वार. सोमवार रोजी ''NEET UG 2026 परीक्षेच्या पेपर लीक व केंद्र सरकारच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ कलेक्टर आॅफीस धाराशिव समोर निदर्शने करण्यात आली आणी निवासी कलेक्टरांना निवेदन देण्यात आले,.....*

देशातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी NEET परीक्षेची तयारी करत असतात. विद्यार्थी व पालक अनेक वर्षे कठोर मेहनत, आर्थिक त्याग आणि मानसिक ताण सहन करून या परीक्षेकडे आशेने पाहतात. मात्र अलीकडे NEET परीक्षेमध्ये झालेल्या पेपरफुटी, गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. या प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्यात आला असून प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. परीक्षा व्यवस्थापनातील अपयश हे केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) यांच्या निष्काळजी कारभाराचे द्योतक आहे. देशभरातून विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे युवक काँग्रेस, धाराशिव वतीने आज खालील मागण्या घेऊन विध्यार्थ्यांच्या हाक्कासाठी धाराशिव येथे आंदोलन करण्यात आले.

1. NEET परीक्षेमधील संपूर्ण गैरव्यवहाराची सर्वोच्च स्तरावर स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

2. पेपरफुटी व भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी.

3. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दोर्षीना तात्काळ अटक करून जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा.

4. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीची चौकशी करून आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात.

5. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

6. विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळता कामा नये. या महत्त्वपूर्ण आंदोलनात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री शिवराज जी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पवार (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस धाराशिव ग्रा.) दादासाहेब गायकवाड (युवक काॅग्रेस जिल्हाउपाध्यक्ष) अॅड इरफान जमादार (जिल्हाउपाध्यक्ष युवक काॅग्रेस)
मुशरफ सय्यद (जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी काँग्रस धाराशिव) संकेत पडवळ (धाराशिव तालुकाअध्यक्ष ) श्रीराम हंगरगेकर, मोईज सय्यद, फुरखान शेख, सौरभ गायकवाड समवेत प्रमुख उपस्थिती दर्शवली.

तसेच, या आंदोलनात काँग्रेस, युवक काँग्रेस आणि NSUI चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! केंद्र सरकारने या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
0 views

Comment