logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*बिअर बार दुकाने फोडणारी आंतरराज्यीय गँग गजाआड*

*बिअर बार दुकाने फोडणारी आंतरराज्यीय गँग गजाआड*

संगमनेर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)

याबाबत अधिक माहिती अशी की,घारगांव पोलीस स्टेशन गु.र.नं.142/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2),331(4) प्रमाणे दिनांक 03/05/2026 रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी किशोर बाळाजी डोकेन रा. खंदरमाळवाडी ता. संगमनेर यांचे हॉटेल निलायम बार येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने शटरचे कुलुप तोडुन हॉटेलमधील विविध कंपन्याची 3,06,190/-रु कि.ची विदेशी दारु, सिगारेट व सी.सी.टिव्ही कॅमे-याचा डि.व्हीआर चोरुन नेलेला आहे.
पो.नि. किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखील स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय पवार, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, अमृत आढाव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणे कामी सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.वरील पथकास हा गुन्हा आरोपी नामे हसन हमजा कुट्टी रा. नाशिक याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे साथीदारासह नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली.
पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम नामे 1) हसन हमजा कुट्टी रा. नवनाथनगर, शेवाडी, पंचवटी नाशिक, 2) आकाश सचिन सुर्यवंशी रा. दत्त चौक, कालीका माता मंदिराजवळ सिडको, नाशिक, 3) मेहताब गुलाम रसुल अन्सारी मुळ रा.नुरीनगर, कटहार तांडा,ता. निंम्मेगड, जि.गिरटी झारखंड असे मिळुन आले.त्यांना विश्वासात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी त्याचे साथीदार 4) बंटी दास पुर्ण नांव माहित नाही रा. झारखंड(फरार) याचेसह नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडे गुन्ह्यातील मुद्देमाला बाबत विचारपुस केली असता त्यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल पळसे ता.जि.नाशिक येथील हॉटेल लकी बार ऍ़ण्ड रेस्टॉरंटचे चालक 5) किरण रामदास उगले 6) विवेक अरुण उगले यांना चोरीचा माल असल्याचे सांगुन विक्री केला असल्याचे व विवेक अरुण याने चोरी करण्यासाठी वाहन उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. किरण उगले व विवेक उगले यांचा शोध घेता किरण रामदास उगले रा.सामनेर ता. इगतपुरी जि.नाशिक हल्ली रा. लकी बार रेस्टॉरंट पळसे नाशिक हा मिळुन आलेला आहे.
ताब्यातील आरोपी किरण उगले यांचेकडुन 4,05,160/- रु कि.ची वेगवेगळ्या कंपन्याची विदेशी दारु , 1,50,000/-रु की.ची एक टाटा इंडिका कार क्रमांक एम.एच.48.एफ.0723, व कटर, मंकी मास्क,एअर पिस्टल स्क्रु डायव्हर, असा एकुण 5,55,160/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.आरोपीकडे त्यांनी आणखी अशा प्रकारे गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल तपास करता आरोपीकडुन अहिल्यानगर जिल्ह्यातील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत.
अ.नं.पोलीस ठाणेगु.र.नं. व कलम
(1)संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर101/2026 बी.एन.एस.कलम 305,331(4) (2)संगमनेर तालुका, जि. अहिल्यानगर115/2026 बी.एन.एस.कलम 305,331(4) (3)वावी, जि.नाशिक 108/2026 बी.एन.एस.कलम 305(अ),331(4)
(4)पिंपळगाव बसवंत जि.नाशिक78/2026 बी.एन.एस.कलम 303(2),305(अ) ताब्यातील आरोपी यांना गुन्ह्याचे तपासकामी घारगाव पोलीस स्टेशन येथे हजर करुन अटक करण्यात आले असुन पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करीत आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

1
12 views

Comment