छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य
झाडे लावा झाडे जगवा जनजागृती अभियान उत्साहात
सातारा | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन आणि जंगल संरक्षणाचा संदेश जनतेपर्य
छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य
झाडे लावा झाडे जगवा जनजागृती अभियान उत्साहात
सातारा | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन आणि जंगल संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा वनवा थांबवा, निसर्ग वाचवा! हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. वाढते तापमान, कमी होत असलेला पाऊस आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन करण्यात आले.
संघटनेने वनवा लावू नका, जंगल, वन्यजीव आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करा, असे सांगत नागरिकांना जागरूक केले. एक झाड लावा अनेक जीवांचे जीवन वाचवा हा संदेश देत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक सहभागाची गरज व्यक्त करण्यात आली.
छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य ही संस्था पर्यावरण संरक्षण, सामाजिक जनजागृती आणि हरित महाराष्ट्र घडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आपला एक छोटासा प्रयत्न हरित महाराष्ट्राचा मजबूत पाया!
छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य