logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शहापूर: आदिवासी परिषद आणि वनविभागात लादेवाडी प्रकरणावर चर्चा

शहापूर : डोळखांब वनपरीक्षेत्रातील लादेवाडी घटनेबाबत वनविभागाकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने 14/05/2026 रोजी डोळखांब वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. मात्र, डोळखांब वनपरीक्षेत्र अधिकारी अजय चव्हाण यांनी आदिवासी विकास परिषदच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करून लेखी आश्वासन दिले की योग्य ती उपाययोजना केली जाईल. त्यामुळे मोर्चाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र मराडे यांनी इशारा दिला की जर वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद केले नाही आणि इतर मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल. यावेळी आदिवासी परिषदचे रविंद्र मराडे, शहापूर तालुका युवा अध्यक्ष हरी हंबीर, तलवाडे ग्रामपंचायत सरपंच अंकुश बरतड, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी वीर, डी. वाय. एस. पी. मिलिंद शिंदे, उपनिरीक्षक खैरनार साहेब, वनविभाग कर्मचारी आणि पोलिस प्रशासन उपस्थित होते.

11
432 views

Comment