logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

*राहुरीत 25 गोवंशांची सुटका...*

*राहुरीत 25 गोवंशांची सुटका...*

राहुरी (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*) याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.मुम्मका सुदर्शन,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये पोनि/श्री.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/ समीर अभंग, पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले,राहुल द्वारके,भिमराज खर्से,चालक चंद्रकांत कुसळकर यांचे पथक तयार करुन गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 15/05/2026 रोजी सकाळी नमूद पथक राहुरी हद्दीमध्ये माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राहुरी शहरात खाटीक गल्ली येथे काही इसम पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना निर्दयतेने बांधुन ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने तात्काळ राहुरी शहरात खाटीक गल्ली येथे खात्री केली असता सदर ठिकाणी गोवंशीय जिवंत जनावरे हे चारा पाण्याविना निर्दयतेने बांधुन ठेवल्याचे दिसुन आले.पथकाने हे गोवंश जनावरे कोणाचे आहे याबाबत विचारपुस करता सदरचे जनावरे हे अन्सार कुरेशी व वशीम कुरेशी व इतर यांचे असल्याचे सांगितले.
पथकाने सदर ठिकाणावरुन 1,62,000/-रु किमंतीचे 25 जिवंत गोवंशीय जनावरे,1,00,000/- रु कि.चे 500 किलो गोमांस, 2,00,000/-रु कि.ची एक छोटा हत्ती टेम्पो असा एकुण 4,62,000/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
दरम्यान आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाणे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271,325,3(5) प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(ब), 5(क), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस ठाणे करीत आहे. जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध धंदे चालु असल्यास फोन नंबर 0241-2416111, डायल 112 यावर कळविणेबाबत नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
57 views

Comment