logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खरातप्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांचे निलंबन

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप असलेले नाशिकचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे-पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. सोबतच भांडे-पाटील यांची विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे.

उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत

असताना भांडे यांचे खरातसोबत आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगितले जाते.

याबाबतचे कॉल रेकॉर्डस हाती आल्यानंतर बावनकुळे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. खरातशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर भांडे-पाटील यांची मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी पदावरील प्रतिनियुक्ती तातडीने संपुष्टात आणून त्यांना २४ मार्च रोजी मंत्रालयातील महसूल व वन विभागात तत्काळ रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.

4
1017 views

Comment