*वार्ड नंबर ०२ मधील डॅा.राज शेखला बेकायदा गर्भपात प्रकरणी अटक*
*वार्ड नंबर ०२ मधील डॅा.राज शेखला बेकायदा गर्भपात प्रकरणी अटक*
श्रीरामपूर (*शिवप्रहार न्यूज नेटवर्क*)लोणी पोलीस स्टेशन येथे दाखल असणाऱ्या गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीरपणे गर्भपात प्रकरणाबाबतच्या गुन्ह्यात यापूर्वी एकूण 12 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण दोन डॉक्टर,चार एजंट व सहा संबंधित गर्भवती महिलांचे कुटुंबीय असे एकूण 12 आरोपी अटकेत आहेत.
दरम्यान गुन्ह्याचा बारकाईने तपास करत असताना पोलीसांना असे निष्पन्न झाले की,बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या या श्रीरामपूर येथील डॉक्टर राज अजीज शेख हा पुरवत आहे. त्यानुसार आज बुधवारी डॉक्टर राज शेख, वार्ड नंबर 2 यांना अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर येथील पथकाने ताब्यात घेतले.त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचे कबूल केले आहे.त्यानुसार सदरच्या गुन्ह्यामध्ये डॉक्टर राज अजिज शेख,राहणार-वार्ड नंबर ०२,श्रीरामपूर याला अटक केली आहे.
*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015