logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राज्य सरकारचा मोठा निर्णय: इंधन आणि पैशांच्या बचतीसाठी उचलली ठोस पावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने प्रशासकीय खर्चात कपात आणि पर्यावरण संवर्धनासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवरील भार कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रमुख निर्णय:
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर: सरकारी ताफ्यात आता केवळ इलेक्ट्रिक गाड्यांचाच समावेश केला जाणार आहे. यामुळे इंधनावर होणारा मोठा खर्च वाचणार असून प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल.
ऑनलाईन बैठकांना प्राधान्य: प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी सर्व महत्त्वाच्या बैठका आता ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील.
काॅन्स दौरा रद्द: विदेशी चलनाची बचत करण्यासाठी राज्य सरकारने आगामी 'कान्स' दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंधन आणि पैसा वाचवण्यासाठी राज्य सरकार आता पूर्णपणे सज्ज झाले असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या निर्णयांची कडक अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले आहेत.

6
2229 views

Comment