logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

व्यासपीठावर ज्वाला, भाषणात आरोपांचे वार, कानात मात्र सुरू होता मैत्रीचा गुप्त व्यवहार.

व्यासपीठावर ज्वाला, भाषणात आरोपांचे वार,
कानात मात्र सुरू होता मैत्रीचा गुप्त व्यवहार.

लातुरला संस्कार व संस्कृती वेगळी आहे कारण निवडणुकीत राजकारण निवडणूकी नंतर मनोमिलनाची हि लातुरची संस्कृती आहे तसा लातुर जिल्हा हा दिवंगत महामाहीम पंजाब माजी राज्यपाल तथा माजी गृहमंत्री भारत सरकार शिवराज पाटील चाकूरकर साहेब,
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब, दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर साहेब यांच्या नावाने जिल्हा ओळखला जातो कारण लातुर जिल्हा करण्यात दिवंगत बॅरिस्टर माजी मुख्यमंत्री ए.आर.अतुलें यांचे योगदान आहे हे नाकारता येत नाही तसें पाहता लातुर शहर विधानसभा मतदारसंघाचे माजी पालकमंंत्री आमदार अमित विलासराव देशमुख जिल्हा परिषद निवडणूकी नंतर ब-याच दिवसांनी दौ-यावर होते सोशल मीडियावर मतदार यांनी हि लातुर शहर मतदारसंघाचे आमदार अमीत विलासराव देशमुख यांच्या विषयी पोस्ट टाकली होती की कुंठे आहात असो लातुर शहरातील महानगर पालिका, लग्न सोहळा, उद्योग व्यवसाय उद्घाटनास उपस्थित राहून मतदार संघातील मतदार यांच्याशी जवळीक आमदार अमीत विलासराव देशमुख साधत असतांना
निमीत्त होतं लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते पाटील यांची सुकन्या चि. सौ. कां. डॉ. केतकी व उदगीर येथील श्री.विजय किशनराव माने पाटील यांचे चिरंजीव डॉ. संतोष यांच्या लातूर येथे आयोजित शुभविवाहा सोहळ्यास उपस्थित या वरुन सध्याचे तापमान वाढलंय तसंच लातुरातील राजकारण गरम झालं ते
माजी पालकमंत्री आमदार अमीत विलासराव देशमुख व माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे संवाद व
हास्यमय चेहरा यावरून चर्चा होत आहे शेवटी राजकारणात राजकीय नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हा त्यांचा त्यांचा विषय आहे लोकशाहीत व्यक्ती स्वातंत्र्य आहे निवडणुकीत एकमेकांचे आरोप प्रत्यारोप केलं तर राजकीय वातावरण त्यांच्या भोवतीच फिरत असंत कारण चर्चा तर होणारचं प्रसिध्दी माध्यमांना ही मग काय संधीच घुमा फिराके ? असो
दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनानंतर मा. अशोकराव पाटील निलंगेकर काँग्रेस पक्षात असुन हि निलंगा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षा कडून तिकिट न मिळणं व मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष मा. अभयदादा साळुंके यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देऊन काँग्रेस पक्ष लातुर जिल्हाअध्यक्ष पदासह निलंगा विधानसभा उमेदवारी देऊन आमदार अमित देशमुख यांनी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात निलंगा विधानसभा निवडणूक प्रचार च्या वेळी टिका टिप्पणी केली आरोप प्रत्यारोप केले प्रसिद्धी माध्यमातून दिसुन आले तर लातुर महानगर पालिकेत माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी टोकाची भुमिका घेत टिका टिप्पणी आरोप प्रत्यारोप केले पण निलंगा विधानसभा निवडणूक आमदार संभाजीराव पाटील यांनी गड राखला व लातुर शहर विधानसभा निवडणूकीत माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गड राखला असो लातुर
महानगर पालिका आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ताब्यात घेतली तर लातुर जिल्हा परिषद आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या मदतीने ताब्यात घेतली तर
किल्लारी येथील येथील 'श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना' (पूर्वीचा किल्लारी सहकारी साखर कारखाना) १५ वर्षांच्या बंद अवस्थेनंतर, २०२५ मध्ये नव्याने सुरू झाला आहे. त्यात
औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यशस्वी झाले तर निलंगा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी
अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना (ओंकार शुगर्सने लीजवर चालवण्यास घेतलेला) हा एक महत्त्वाचा सहकारी कारखाना ताब्यात घेण्यात यशस्वी झाले
माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी महाराष्ट्र,
मराठवाड्यात सह साखर कारखानदारीत आपलं आगळ वेगळं स्थान निर्माण केलेंल आहे हे वेगळं सांगायला नको ..? सहकारी साखर कारखाना क्षेत्रात कोणी कोणाला मदत केली हा भाग वेगळा आहे सोशल मीडिया वर सध्या चर्चा होत आहे ती लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते पाटील यांची सुकन्या चि. सौ. कां. डॉ. केतकी व उदगीर येथील श्री.विजय किशनराव माने पाटील यांचे चिरंजीव डॉ. संतोष यांच्या लातूर येथे आयोजित शुभविवाहा सोहळ्यास उपस्थित राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पण चर्चा होंत आहे ती फक्त आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यांतील दिलखुलास संवाद रंगलेला कारण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण साठी लातुर दौ-यावर
आले असता लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सायबर कार्यालय उद्घाटन सोहळा प्रसंगी पालकमंंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार अमित देशमुख यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच आपल्या वर लक्ष आहे ? असं भाषणात वक्तव्य केलं म्हणजे भाजपा मध्ये स्वागतच आहे ? असं तर म्हणायंच नसेल ना ? पण चर्चा होंत आहे तसं आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमातून म्हटंलेलं
होतं की गडी मजबूत आहे व आहोत तेथेचं आनंदी आहोत कारण आज ही मराठवाड्यातील एकमेव लातुर शहर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक मतावर विजय प्राप्त केला पण शेवटी राजकारणात काही होऊ शकते ? जसं दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख लातुर शहर विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत पराभूत झाल्यानंतर दिवंगत हिंदुहदय सम्राट तथा सामना संस्थापक संपादक व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कडे विधानपरिषदे करीता तिकिट मागीतले होते ? हे नाकारता येणार नाही ? असो पण पालकमंंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विधानाच्या नंतर आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. तर लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती दिल्याबद्दल मुंबई मंत्रालयात आरोग्य मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन आभार मानले. आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच राजकारणात साटलोट आहे. एकमेकांना सोयीचे होईल असे राजकराण ते करतात. असं चर्चेलं जात आहे ? जसं दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्री होती दिवगंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री तर दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते यांच्यातील मैत्री जगजाहीर होती बिड जिल्ह्यात भाजपा तर लातुरात काँग्रेस मय वातावरण होतं पण दिवंगत महामाहिम पंजाब माजी राज्यपाल तथा माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब भारत सरकार यांच्या विषयी राजकीय डावपेच आम्ही रचायचो असं लातुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील जाहिर सभेत मान्य केलं होतं ..? होतं असंच राजकारण असतं म्हणून कार्यकर्ता पदाधिकारी यांनी मनावर घ्यायचं नसतं सोशल मीडिया वर विनाकारण द्वेष करायचा नसतो शेवटी राजकारणात राजकीय नेत्यांनी आपल्याला राजकीय फायदा कसा होईल याचा अभ्यास व अनुभव असतो शेवटी लग्नाच्या निमित्ताने भेटुच नये असं हि नाही नजरे कही पर निशाणा कही और अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील यात शंका नाही पण शेवटी राजकारणात असंच असंत सत्तेतुन संपत्ती, संपत्तीतुन सत्ता कार्यकर्ता यांना निवडणुकीत मिळतो भत्ता ?
अल्पसंख्याक मतदारांनी मराठवाड्यातील एकमेव लातुर शहर विधानसभा मतदारसंघातुन आमदार म्हणून निवडून दिलें असल्याने लातुर महानगर पालिकेत १७ मुस्लिम नगर सेवक आहेत लातुर जिल्हा रुग्णालयाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे नाव देण्याची मागणी लातुरकर यांच्या कडून होत आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब , पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील , आमदार अमीत विलासराव देशमुख,
आमदार अभिमन्यु पवार, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे , यांनी पुढाकार घेऊन लातुर रुग्णालयाला बॅरिस्टर ए .आर. अंतुले यांचे नाव देण्याची मागणीचा विचार करुन पुढाकार घेऊन बॅरिस्टर ए .आर. अंतुले यांचे नाव देण्याची
मागणी चर्चित आहे असो एवढं मात्र नक्की व्यासपीठावर ज्वाला, आरोपांचे वार,कानात मात्र सुरू होता मैत्रीचा गुप्त व्यवहार. अशी जनतेतून जोरदार चर्चा होत आहे

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

2
57 views

Comment