logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वर्धा जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी मुलाखती उत्साहात संपन्न

वर्धा / प्रतिनिधी: वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. विभागीय प्रभारी व प्रदेश उपाध्यक्ष कपिल ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या.

यावेळी इच्छुक पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधून त्यांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच युवक काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या प्रसंगी वर्धा जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी सागर चव्हाण, सहप्रभारी आयुषी देशमुख, प्रदेश सचिव अफजल बेरा तसेच अंकुश मुंजेवार प्रमुख उपस्थित होते.

लवकरच वर्धा जिल्हा युवक काँग्रेसला सक्षम, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0
757 views

Comment