logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सातारा जिल्ह्यात वादळी पाऊस आणि विजांचा इशारा

सातारा : दि. १३ मे रोजी सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून वादळी पाऊस व विजांचा इशारा देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात हवामान ढगाळ असून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने काही भागांत विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस आणि ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि अनावश्यकपणे बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0
46 views

Comment