logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

महाराष्ट्र राज्य परिवहन बस सेवेतील समस्या आणि सुधारणा सूचना

महाराष्ट्र : राज्य परिवहन बस सेवेत अनेक समस्या आढळून येत आहेत. प्रत्येक बस वाहक आणि चालक धूम्रपान करत असतात, मोबाईल फोन वापरत असतात तसेच सुट्टे पैसे नसणे, प्रवाशांशी आधारावर संवाद साधता न येणे आणि तिकीट काढताना नेटवर्कची अडचण होणे यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. बस चालक जेवणासाठी ३० ते ३५ मिनिटे थांबतात आणि प्रवासी कंटाळून जातात. तसेच गाडी वेळेवर न सोडणे, नशा पाणी करणे आणि सकाळी चालकांच्या तोंडाचा वास येणे ही समस्या दिसून येते.

सरकारने प्रत्येक बस स्थानकात स्वतःचे हॉटेल नियोजन करावे आणि खाजगी हॉटेलवर अवलंबून न राहावे, कारण प्रवाशांची लुटमार होते. स्वच्छता आणि अपंगांसाठी सोयीसुविधा नसणे, तसेच महिला प्रवाशांकडून शौचालयासाठी शुल्क घेणे या बाबतीतही तक्रारी आहेत. बस आरक्षण मोबाईलवर सुलभ करावे आणि एक तास अगोदर आरक्षण करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आहे.

5
213 views

Comment