logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ठाणे जिल्ह्यात पावसाळी आपत्ती व्यवस्थापन तयारी बैठकीत मार्गदर्शन

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली 'मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक २०२६' समिती सभागृहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांनी आगामी पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सतर्कता आणि समन्वय वाढवण्याचे निर्देश दिले गेले. जिल्हाधिकारीांनी जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा मजबूत करण्यास आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी 'आपदा मित्र' संख्या वाढवण्यास सांगितले.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे ऑडिट करण्याचे, जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करण्याचे, तसेच राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड कोसळण्याच्या घटनांसाठी जेसीबी, पोकलेन व डंपरची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. डॉ. पांचाळ यांनी अग्निशमन दल, पोलीस व आरोग्य विभागांनी तालुक्यांमध्ये रंगीत तालीम घेण्यावर भर दिला. आरोग्य विभागाने साथीच्या रोगांकरिता औषध साठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत असेही सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आपत्ती निवारणासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.

5
539 views

Comment