नवी मुंबई: धर्मवीर प्रतिष्ठानतर्फे संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
नवी मुंबई: जुईनगर येथील धर्मवीर प्रतिष्ठान यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा सोहळा १३ व १४ मे २०२६ रोजी गावदेवी चौक, पेट्रोल पंपाजवळ जुईनगरमध्ये पार पडणार आहे.
पहिल्या दिवशी सायंकाळी ८ वाजता संभाजी महाराज यांच्या गौरवशाली जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित होईल. दुसऱ्या दिवशी सकाळपासून ज्योत आगमन, अभिषेक, प्रतिमा पूजन, ऐतिहासिक मर्दानी खेळ, महाआरती, तसेच रायगड भूषण शाहीर गणेश ताम्हाणे यांचा पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी महाप्रसाद देखील दिला जाणार आहे.
धर्मवीर प्रतिष्ठान कमिटी व सर्व सदस्यांनी या सोहळ्याला शिवशंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे