logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भंडारदरा गावात दुषित पाणी पुरवठा ग्रामपंचायतचे दुर्लक्ष तर आरोग्य विभाग सुस्त

अकोले :- भंडारदरा गावात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून नळाला गाळ मिश्रित पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीत वारंवार तक्रार करुनदेखील हा प्रश्न सोडवला जात नसल्यामुळे दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.

गावात पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे. प्रवरा नदी पात्रातुन गावाला पाणी पुरवठा केला जातो. नदीपात्रातील पाणी अतिशय शुध्द असुन सद्या याच नदीपात्रात ग्रामपंचायतने नविन विहिरीची बांधकाम चालु केल्याने संबंधित ठेकेदाराने नवीन विहिरीची माती जुण्या विहिरीत टाकल्याने गावात गेल्या महिनाभरापासून गढुळ व माती मिश्रित अतिशय खराब पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत अगोदर पर्यायी व्यवस्था करावी ग्रामपंचायतने किमान शुध्द पाण्याचा पुरवठा करावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे, पण भंडारदरा गावातील नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

भंडारदरा ग्रामपंचायतने पुर्व नियोजन न करता नविन विहिरीची काम चालू केल्याने पिण्याचे पाणी कुठून आणावे असा प्रश्न नागरिकांच्या समोर निर्माण झाला आहे, कोणतेही पुर्व नियोजन न करता मनमानी पद्धतीने नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता घाईघाईने नविन विहिरीची काम चालू केल्याने नळांना माती मिश्रित अतिशय खराब पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे कडक उन्हाळा सुरू असताना दुसरीकडे दूषित पाण्याचे संकट देखील निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. ग्रामपंचायत यंत्रणेने याची दखल घ्यावी व जोपर्यंत शुद्ध पाण्याची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नवीन विहिरीचे बांधकाम थांबवावे अशी मागणी होत आहे.

तर दुसरीकडे पाण्याचे नमुने तपासणारे आरोग्य विभाग मात्र सुस्त असल्याने गावात दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याबाबत आरोग्य विभागाने आपली भुमिका स्पष्ट करावी असे ग्रामस्थांचे म्हणण

0
99 views

Comment