logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

समृद्ध पंचायत राज मोहिमेत लोणीची दमदार छाप; तपासणी समितीकडून विकासकामांना सकारात्मक दाद.

लोणी प्रतिनिधी:- तेजस वाळुंज

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ अंतर्गत तालुका स्तरीय मूल्यांकन समितीने लोणी ग्रामपंचायतीला भेट देत गावातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी पाहून समितीने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
या अभियानाच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या खालापूर आणि आंबेगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी गावातील विकासकामांचा बारकाईने आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय दप्तर, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुविधा तसेच विविध पायाभूत योजनांची तपासणी करण्यात आली. यासोबतच गुणांकन प्रक्रियाही पार पाडण्यात आली.
पाहणीदरम्यान समिती सदस्यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधत विकासकामांबाबत अभिप्राय जाणून घेतला. ग्रामपंचायतीने राबवलेल्या उपक्रमांबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले, तर समितीनेही कामांच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
या तपासणी दौऱ्यास खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड, प्रकल्प अधिकारी विशाल कोटांगडे, विस्तार अधिकारी विनोद चांदोरकर, तालुका समन्वयक संदीप मोगरे, शाखा अभियंता आशिष पवार व सचिन हंबीर उपस्थित होते. तसेच आंबेगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी वैशाली इदे, विस्तार अधिकारी रवींद्र खंडारे, सुभाष बारवे आणि तालुका समन्वयक पंकज चौधरी यांनीही सहभाग नोंदवला.
यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे लोणी गावाच्या विकासकार्याला नवी दिशा मिळणार असून, पुढील काळात गाव अधिक आदर्श करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला.

0
46 views

Comment