आझाद समाज पार्टीचा थेट इशारा. माष्टी प्रकरणातील दोषीवरकार्यवाही कराअन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल
आझाद समाज पार्टीचा इशारा: माष्टी प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन!
जिल्हा प्रतिनिधी पद्माकर हाडोळीकर ..नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील माष्टी बौद्ध वस्तीवर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे या घटनेचे पडसाद उमटत असून विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
येथील गाजत असलेल्या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आझाद समाज पार्टी चे जिल्हा प्रभारी प्राध्यापक प्रभाकर वाघमारे वतीने करण्यात आले आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर संपूर्ण महाराष्ट्रात 'राज्यव्यापी आंदोलन' छेडण्याचा थेट इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आझाद समाज पार्टी आता आक्रमक भूमिकेत आली आहे. "प्रशासन दोषींना पाठीशी घालत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. लोकशाही मार्गाने आम्ही आमचा लढा तीव्र करू," असे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
प्रमुख मागण्या:
माष्टी प्रकरणातील मुख्य आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.
पीडित पक्षाला त्वरित संरक्षण आणि न्याय मिळावा.
या इशाऱ्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आता पोलीस आणि स्थानिक प्रशासन काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाची ठिणगी पडण्यापूर्वी दोषींवर कारवाई होणार का? हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.चे