logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

'आयपीएल 'च्या धर्तीवर महाराष्ट्रात 'प्रो लीग कुस्ती' आ. रोहित पवार यांची कोल्हापुरात ग्वाही

'आयपीएल 'च्या धर्तीवर महाराष्ट्रात 'प्रो लीग कुस्ती'
आ. रोहित पवार यांची कोल्हापुरात ग्वाही

विलास केजरकर भंडारा

भंडारा: आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रो लीग कुस्ती स्पर्धा आयोजित करून पैलवान आणि जिल्हा कुस्ती संघांना अधिक मजबूत करण्यात येईल अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी दिली.
ते कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता त्यांनी कुस्तीगीर आणि तालीम संघाच्या सदस्यांशी संवाद साधतांनी बोलत होते.
आमदार पवार म्हणाले, काही अनधिकृत संघटनांकडून राजकीय वापर करून कुस्तीगिरांना वेठीस धरले जात आहे ही बाब खेळासाठी हानिकारक आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने स्वतःचे घर सांभाळल्याप्रमाणे कुस्तीगीर आणि संघटना सांभाळली असून त्याचे अनुकरण इतर जिल्ह्यांनी करावे, असेही त्यांनी नमूद केले. तालीम संघाच्या पैलवान वस्तिगृहासाठी आवश्यक निधी सीएसआर फंडातून मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आ. पवार यांनी मोतीबाग तालमीचा संस्थानकालीन आखाडा आणि नवीन वस्तिगृह इमारतीची पाहणी करून कौतुक केले. याप्रसंगी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदक मिळवल्याबद्दल गौरव पाटील आणि राजवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मोतीबाग तालमीत नव्याने दाखल झालेले मल्ल अभिमन्यू नैन (हरियाणा) व सुर्वेश शेरावत (दिल्ली) यांचाही सत्कार करण्यात आला. सरचिटणीस अशोक पोवार यांनी प्रास्ताविक केले.
खुल्या संवादादरम्यान तालीम संघ अध्यक्ष व्ही. बी. पाटील, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, प्रदीप गायकवाड, हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी काही संघटनांकडून कुस्तीगिरांवर होणाऱ्या अन्यायाची विवंचना मांडली. जि. प. माजी सदस्य बी. एच. पाटील यांनी आभार मानले. यावेळी हिंदकेसरी विनोद चौगुले, बाजीराव कळंत्रे, संभाजी वरुटे, प्रकाश खोत, बटू जाधव, संभाजी पाटील, शिवाजी कवठेकर, चंद्रकांत चव्हाण, विलास पाटील, राजाराम चौगुले, जयकुमार शिंदे, दादू चौगुले, प्रा. बाजीराव पाटील, रणजित पाटील, विश्वास हारुगले, साताप्पा मगदूम, विजय साळुंखे यांसह कुस्तीगीर उपस्थित होते.

*Devashish Govind Tokekar*
*VANDE Bharat live tv news Nagpur*
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
*Indian Council of press,Nagpur*
Journalist Cell
*All India Media Association
Nagpur*
*District President*
*Delhi Crime Press*
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

6
177 views

Comment