logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिरूर: गट नंबर 1751/1211 अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश

पुणे: शिरूर तालुक्यातील गट नंबर 1751/1211 च्या अतिक्रमणासाठी नियमितीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 40, 52 व 64 नुसार 01 जानेवारी 2011 पर्यंतच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण केले जाणार आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण व शहरी भागातील शासकीय जमिनीवरील निवासासाठी करण्यात आलेले अतिक्रमण नियमित करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.

प्रशासनाने पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह 31 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अनिल मल्लाव यांनी सुद्धा वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. तथापि, नद्या, नाले, सार्वजनिक रस्ते, वन जमीन, भूसंखलन प्रवण क्षेत्र, वेटलँड आणि सीआरझेड क्षेत्रातील अतिक्रमणधारकांना नियमितीकरणाचा लाभ दिला जाणार नाही, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ मिळणार आहे. याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9028289770 दिला आहे.

29
474 views

Comment