स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, घोडप बु. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
....
स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालय, धोडप बु. ता. रिसोड जि. वाशिम या विद्यालयाने एस.एस.सी. परीक्षा 2026 मध्ये 94.87% इतका घवघवीत निकाल लावून उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा पुन्हा एकदा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, पालकांचे सहकार्य तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे हे यश संपादन झाले आहे.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्णतेतच नव्हे तर प्राविण्य श्रेणीतही उल्लेखनीय यश मिळवून विद्यालयाच्या लौकिकात भर घातली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य विद्यालय अनेक वर्षांपासून निष्ठेने करत आहे. त्यामुळेच उत्कृष्ट निकालाची परंपरा ही विद्यालयाची ओळख बनली आहे.
या यशामागे संस्थेचे प्रेरणास्थान स्व. भगवानरावजी गायकवाड साहेब यांचे विचार, संस्थेचे अध्यक्ष रवींद्रभाऊ गायकवाड साहेब, सचिव संतोषराव गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शन तसेच मुख्याध्यापक सज्जनराव बाजड सर यांचे कुशल नेतृत्व मोलाचे ठरले आहे.
विद्यालयाचा हा उज्ज्वल निकाल सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून आगामी काळातही अशीच यशस्वी वाटचाल कायम राहो, हीच अपेक्षा. सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!