फरार सहायक आयुक्ताना अटक
ठाणे : लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले ठाणे महापालिकेचे माजी साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले. आहेर यांचा शोध घेण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेने विविध ठिकाणी पथके रवाना केली होती.
कोल्हापूरमधील एका लॉजमध्ये ते लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर छापा मारून त्यांना ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी आहेर यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचेही नाव समोर आले आहे. तक्रारदार महिलेला नाशिक येथे नेऊन अघोरी प्रकार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.