logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लग्नाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; सावध राहा, अन्यथा मोठा फटका! मुलगी आणून देतो म्हणत दलालांचे जाळे सक्रीय

लग्नाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; सावध राहा, अन्यथा मोठा फटका!



मुलगी आणून देतो म्हणत दलालांचे जाळे सक्रिय; दोन ते तीन महिन्यांतच विवाह फसवण्याचे प्रकार उघड-प्रविण महाजन



अमळनेर (प्रतिनिधी) :

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून आपल्या मुला-मुलींच्या योग्य जुळणीसाठी पालकांची धावपळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र या भावनिक आणि नाजूक परिस्थितीचा गैरफायदा घेत काही भामटे दलाल भोळ्या कुटुंबांना जाळ्यात ओढत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.



मुलगी आणून देतो, पण त्यासाठी दोन लाख रुपये द्या, अशा आमिषाला बळी पडून अनेक कुटुंबांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी मुलगी दोन-तीन महिने सासरी राहून अचानक निघून जाते आणि पुन्हा दुसरीकडे लग्न लावल्याचेही प्रकार घडत आहेत. या साखळी फसवणुकीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असून मानसिक व आर्थिक आघात सहन करावा लागत आहे.

खान्देश वधू-वर सूचक, अमळनेरचे प्रवीण बी. महाजन आणि सौ. अनिता महाजन यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशा दलालांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही व्यवहाराआधी सखोल चौकशी करा, कागदपत्रांची खातरजमा करा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

गेल्या २० वर्षांपासून खान्देश वधू-वर सूचकच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ऑनलाइन व ऑफलाइन सेवा देत सामाजिक बांधिलकी जपणारे प्रवीण महाजन यांनी सांगितले की, अशा प्रकारची फसवणूक आढळल्यास युवक-युवतींनी व पालकांनी तात्काळ तक्रार करावी. वेळेत घेतलेली दक्षता मोठे नुकसान टाळू शकते.

लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय पण त्याच भावनेचा गैरफायदा घेणाऱ्या फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहणे आज काळाची गरज बनली आहे.

0
66 views

Comment