प्रबुद्ध चषक 2026 भव्य बुद्धिबळ स्पर्धा श्रीपुर
आज आपल्या श्रीपूर मध्ये _प्रबुद्ध बहुउद्देशीय सामाजिक संस्था, श्रीपूर_ यांच्या वतीने *"प्रबुद्ध चषक 2026 - भव्य बुद्धिबळ स्पर्धा"* चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते!
कार्यक्रमाची सुरुवात *छत्रपती शिवाजी महाराज* व *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. शिवरायांची शौर्यगाथा आणि बाबासाहेबांची विद्वत्ता या दोन्ही महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन लहान-थोरांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपनगराध्यक्ष भीमराव रेडेपाटील, गटनेते राहुल अप्पा रेडे पाटील, नगरसेवक प्रकाश नवगिरे सर, मौला चाचा पठाण, नवनिर्वाचित मुख्याध्यापक श्री शंकर यादव सर,मा नगरसेवक विक्रम लाटे, नगरसेवक मोहसीन पठाण, मा.जिप सदस्य सुहास गाडे, RPI अध्यक्ष सुधीर भोसले, राजे ग्रुप अध्यक्ष बबन कदम,ज्ञानेश्वर काटे मा ग्रा. सदस्य, जालिंदर खरात, रोहित काळे उपस्थित होते
तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी उप नगराध्यक्ष भिमराव रेडे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अनिलदादा जाधव,नगरसेवक प्रकाश नवगिरे सर, सतीश भाऊ लांडगे मा ग्रा. सदस्य , राष्ट्रवादी (sp) चे संदिप मामा घाडगे,प्रा नरेंद्र भोसले सर ,मा रशीद मुलाणी, राहुल बाबर सर,राजाभाऊ सुरवसे, समाधान लांडगे,प्रशांत नवगिरे, सूर्यकांत बनसोडे,प्रवीण गाडे साहेब,उपस्थित होते,
बुद्धिबळ हा केवळ खेळ नाही, तो *संयम, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमतेचा* खेळ आहे. बाबासाहेब म्हणत, "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" - या स्पर्धेतून आपल्या पोरांनी हेच शिकायला हवं.
*प्रबुद्ध बहुउद्देशीय सामाजिक संस्था श्रीपूर* यांचे हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे.