logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

एटीएम कार्ड बदलवून ९० हजारांत फसवणूक

जळगाव : एटीएम केंद्रामध्ये कार्डची

अदलाबदल करून श्रीराम संतोष जामोदकर (५१, रा. न्यू सम्राट कॉलनी) यांची ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २ मे रोजी उघडकीस आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासगी नोकरी करणारे श्रीराम जामोदकर हे १ मे रोजी पांडे डेअरी चौकातील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. तेथे एक अनोळखी आला व त्याने जामोदकर यांच्याशी चर्चा करीत त्यांच्याकडील एटीएम कार्डची अदलाबदल केली. तसेच दुसरे कार्ड त्यांच्या हाती तर दिलेच शिवाय ते पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना पिन नंबरही बघितला. त्यानंतर त्याने एटीएम कार्डचा वापर करून वेळोवेळी एकूण ९० हजार रुपये परस्पर काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर श्रीराम जामोदकर यांनी फिर्याद दिली. तपास पो.हे.कॉ. भगवान चौधरी करीत आहेत.

12
794 views

Comment