logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भाटघर ता.खंडाळा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे उद्घाटन*

*भाटघर ता.खंडाळा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखेचे उद्घाटन*

प्रतिनिधी/शेखर जाधव

सातारा/जावली:-- वाई/खंडाळा भाटघर गावचा इतिहास नसून एक ऐतिहासिक इतिहास आहे. ज्या गावाने भाटघर धरण निर्मिती साठी जवळपास साडेतीन हजार एकर जमीन धरण क्षेत्रात गेली ज्या शेतीवर त्या लोकांचा उदरनिर्वाह चालत होता ते गेले आणि फक्त आणि फक्त मोलमजुरी नोकरी धंदा करून उदरनिर्वाह करणे एवढच या गावातील लोकांच्या नशिबी उरल आहे. सरकार दरबारी हेलपाटे मारून शुद्ध आजपर्यंत त्यांच्या पदरी निराशाच आहे अशा परिस्थितीत तरीही न डगमता स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. अशा या धरणग्रस्त गाववचे सुपुत्र श्री प्रविण विर काही दिवसापासून अखिल भारतीय मराठा महासंघ खंडाळा तालुका अध्यक्ष म्हणून समाज कार्य करत आहेत कैलासवाशी माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्व.अण्णासाहेब पाटील यांचे विचार आणि ध्येय संघटनेचे धोरण मनाशी बाळगून त्यांच्या विचारांंना प्रेरित होऊन त्यांनी प्रथम आपल्या गावापासून सुरवात केली आपण पण सामाजाचे काही तरी देणे लागतो समज कार्याची धुरा संभाळत गावातील मराठा तरुण बांधवांना एकत्र करून विचार विनमय करुन दिनांक 3 मे 2026रोजी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र कोढंरे साहेब आणि सातारा जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी बहुमोलाचे असे त्यांनी मार्गदर्शन केले या वेळी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन ही देण्यात आले. या मध्ये ग्रामस्थांच्या वतीने आणि जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने ही मनोगत व्यक्त केले या वेळी शाखेच्या कार्यकारणीतील पदाधिकारी यांंना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले शाखेचे अध्यक्ष तेजेश वीर,उपाध्यक्ष कु.अमर वीर,कार्याध्यक्ष श्री विशाल वीर.सरचिटणीस अँड क्षीतिज विर.तर कोषाध्यक्ष कु.सत्यम दानवले.संघटक संकेत वीर.सदस्य श्री विशाल वीर.सदस्य श्री चेतन सोंडकर,सदस्य .श्री विपूल वीर .सदस्य श्री तेजल उ. वीर,सदस्य श्री अविनाश पडवळ,सदस्य कु.अकाश वीर.तर सदस्य म्हणून कु.गणेश चंदनशिव.यांच्या निवडी करण्यात आल्या.या वेळी जिल्हाध्यक्ष खंडाळा तालुक्यातील जवळे गावचे श्री दतात्रय पाटील साहेब जितेंद्र भोसले सरचिटणीस सातारा जिल्हा, नितिन साळुंखे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष, राकेश गायकवाड पुणे ,गणेश मापारी पुणे, सुनिल धनावडे,जावली ता,अध्यक्ष ,बजरंग दादा वांगडे.सातारा जिल्हा संघटक,संदीप माने संयुक्तसरचिटणीस सातारा जिल्हा उत्तर,राहुल शिंदे उपाध्यक्ष सातारा जिल्हा सातारा विभाग,सुनील यादव कार्याध्यक्ष खंडाळा तालुका, बजरंग चौधरी उपाध्यक्ष सातारा जिल्हा जावली विभाग,तुकाराम यादव उपाध्यक्ष खंडाळा तालुका,गुलाबराव गायकवाड संयुक्त सरचिटणीस खंडाळा तालुका, हनुमांत शिंदे जावली तालुका कार्याध्यक्ष,सुनिल लिमण सरचिटणीस खंडाळा तालुका,भरत देशमुख खंडाळा तालुका कोषाध्यक्ष, अनिल करंदकर सातारा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष,अंकुश पवार खंडाळा तालुका संघटक,अक्षय भोसले खंडाळा तालुका युवक अध्यक्ष,, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाटघर ग्रामस्थ पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता मराठा समाजा साठी आणि त्यांच्या हक्कां साठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य

0
115 views

Comment