logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, सोन्याच दर उच्चांकावरुन 26778 रुपयांनी घसरले, चांदी किती स्वस्त

नवी दिल्ली : भारतात एप्रिल मे महिना लग्नसराईचा मानला जातो, या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. 29 जानेवारीला सोने आण चांदीच्या दरानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र सोने आण चांदीच दर घसरले आहेत. जानेवारीमध्ये सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत सोन्याच दर 26778 रुपयांनी घसरले आहेत. तर, चांदीचा दर देखील 143106 रुपयांनी कमी झाला आहे. आयबीजेएकडून सोने आण चांदीच दर सोमवार ते शुक्रवार दररोज जाहीर केले जातात. 1 मे रोजी सुट्टी असल्यानं गुरुवारी सोन्याच दर जाहीर करण्यात आले होते. त्या दरांनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 148652 रुपये आहे. तर, 23 कॅरेट सोन्याचा दर 148057 रुपये इतकी आहे. 22

कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 136165 रुपये इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 111489 रुपये इतका आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा दर 86961 इतका आहे.

3
472 views

Comment