logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पुणे नरसापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणावर जळगावात उत्तर भारतीय ब्राह्मण समाज तरफे आंदोलन

पुणे जिल्हा: नरसापूर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे जळगाव येथे उत्तर भारतीय ब्राह्मण संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आरोपीला कडक शिक्षा देण्याची आणि प्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनात मोठ्या संख्येने बालिका व समाजातील नागरिक सहभागी झाले होते. संस्थापक अध्यक्ष मोहनजी तिवारी यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत शासन व प्रशासनाकडे महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची याचा प्रश्न उपस्थित केला. आंदोलनात राहुल अवस्थी, रोहित तिवारी, मिलिंद तिवारी, लेखराजजी उपाध्याय, सुरेंद्रजी मिश्रा, तुषार मिश्रा, ॲड. गोविंद तिवारी, पंडित दुबे, हर्षल तिवारी, दिनेश बाजपेयी यांसह बालिका आर्या अवस्थी, सोना तिवारी, गार्गी अवस्थी, भक्ती पांडे, समीक्षा बाजपाई, भाव्या पांडे, श्लोक पांडे यांनी सहभाग घेतला.

0
31 views

Comment