logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गंधकुटी घुबडमेट येथे बुद्ध जयंती कार्यक्रम पार पडला.

काटोल प्रतिनिधी:-
काटोल येथील गंधकुटी घुबडमेट येथे बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांचा जागर करण्यात आला.
या कार्यक्रमाला समता सैनिक दल, दीक्षाभूमी (नागपूर) चे मुख्य संयोजक घनश्यामजी फुसे, वरिष्ठ समन्वयक राजरत्नजी कुंभारे, तसेच चिकाटे सर, भांगे सर, रामटेके सर आणि ज्येष्ठ समाजसेवक गुलाबरावजी तागडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी समता सैनिक दलाची शिस्त, संघटनात्मक बांधणी आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यावर प्रभावी मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात ॲड. अपूर्वा पिट्टलवार यांची समता सैनिक दलाच्या 'कायदेशीर सल्लागार' पदावर नियुक्ती करण्यात आली. ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद बाब ठरली.
कार्यक्रमास स्थानिक मान्यवर म्हणून समता सैनिक दलाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ गजबे, कमांडर डॉ. सुनील नारनवरे, मुख्य शाखा संघटक भागवतजी पाटील, सचिव दीपक ढोके, शाखा संघटक विकास सोमकुवर, माजी नगरसेवक दिंगबरजी डोंगरे, सतीशजी काळे, दिलीपजी काळे, डॉक्टर गजबे, पंचफुलाबाई गुलाबजी तागडे तसेच तागडे मामा उपस्थित होते.
समता सैनिक दलाच्या लक्ष्मीबाई शेंडे व महिला कमांडर संध्याबाई सहारे, संघटक-कांताबाई गजभिये,संघटक- संगीता निकोसे, संघटक - अनिता मेश्राम इतर पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सैनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव, मसोरा, जुनोना, चंदनपारडी, मेंडकी, चिखली, हातला, सोनोली, परसोडी, सिंदी व सावळी येथील सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पांढऱ्या गणवेशातील सैनिकांची शिस्त आणि उत्साह विशेष उल्लेखनीय ठरला.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भुजंगजी गोंडाने यांनी केले. शेवटी बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

47
2635 views

Comment