logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भिगवण: विठ्ठलराव थोरात विद्यालयाचा बारावी निकाल ९७.४३ टक्के

भिगवण : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विठ्ठलराव थोरात इंग्लिश मीडियम स्कूलने ९७.४३ टक्के एकूण निकाल मिळवून परंपरा कायम राखली आहे. या निकालात मुलींनी विशेष वर्चस्व गाजवले आहे.

विद्यालयात सिद्धी नितीन चितळकर हिने ७९.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिद्धी ही पत्रकार नितीन चितळकर यांची कन्या असून तिच्या यशाबद्दल भिगवण आणि परिसरातून विशेष कौतुक होत आहे. द्वितीय क्रमांकावर समृद्धी राजेंद्र काळे (७६.६७%) आणि तृतीय क्रमांकावर श्रुती सतीश भोसले (७४.३३%) आहेत.

विद्यार्थ्यांनी विषयांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली असून, प्रतीक संजय वचकलने माहिती व तंत्रज्ञानातून ९५ गुण मिळवले. समृद्धी काळे यांनी मराठी (९५) आणि भूगोल (९४) मध्ये गुण मिळवले. सिद्धी चितळकर हिने गणित (८५) आणि भौतिकशास्त्र (७९) मध्ये चांगली कामगिरी केली आहे. या यशाबद्दल राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूराव थोरात, सचिव विजय थोरात, प्राचार्या वंदना थोरात आणि इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

1
77 views

Comment