logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कै. अण्णासाहेब गायकवाड महाविद्यालयाचा 100% निकाल कला-विज्ञान शाखेत

सिंदखेड राजा: देऊळगाव कोळ येथील कै. अण्णासाहेब गायकवाड विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या 12 वी परीक्षेत उत्कृष्ट निकाल नोंदविला आहे. कला व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये शंभर टक्के निकाल लागला असून परिसरातील शैक्षणिक परंपरेला कायम राखण्यात महाविद्यालय यशस्वी ठरले आहे.

कला शाखेत 34 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, सर्वांनी उत्तीर्ण होऊन 100% निकाल साध्य केला. काजल संतोष चातारकर 82% गुणांसह प्रथम, साक्षी समाधान लहाने 77% गुणांसह दुसऱ्या, तर वैष्णवी दत्तात्रय लादे 76% गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विज्ञान शाखेतही सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निहारिका शिवाजी लकडे 89% गुणांसह प्रथम, संकेत संजय मोरे 84% गुणांसह दुसऱ्या आणि साक्षी विजय बोडखे 83% गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. प्राचार्य बालासाहेब रावसाहेब गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीने हा निकाल साकार झाला आहे.

11
4001 views

Comment